नेफ्रोप्लस तर्फे डायलिसिस ऑलंम्पियाड २०१९ घोषणा

915

नेफ्रोप्लसच्या वतीने अशा पद्धतीच्या पहिल्यावहिल्‍या क्रिकेट सामन्याचे आयोजन

जगातील एकमेव अशा डायलिसिस ऑलिंपियाड २०१९ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील सर्वांत मोठे डिलिव्हरी नेटवर्क असलेल्या नेफ्रोप्लसच्या वतीने आज पुण्यात डायलिसिस पाहुणे (रुग्ण) विरुद्ध नेफ्रोलॉजिस्ट अशा मैत्रीपूर्ण ‘क्रिकेट’ सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. डायलिसिसवर जगणाऱ्या रुग्णांनी शक्य तेवढे सामान्य आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून हा सामना आयोजित करण्यात आला होता.

डायलिसिस ऑलंम्पियाड चे आयोजन २२ डिसेंबर २०१९ रोजी बालेवाडी स्टेडियम वर सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत करण्यात आले आहे. डायलिसिसवर जगणारी भारतातील कोणतीही व्यक्ती या एकदिवसीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकते. या कार्यक्रमात  धावणे, सायकलिंग, बास्केटबॉल, टेबल टेनिस, सुडोकु, कॅरम इ. सारख्या खेळांमध्ये सहभागी होऊन ती व्यक्ती आपले कौशल्य सर्वांना दाखवून देऊ शकते. प्रत्येक खेळातील विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे..

नेफ्रोप्लस विषयी:

डायलिसिस सेवा पुरविणारे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क नेफ्रोप्लस सर्वोत्कृष्ट दर्जाची डायलिसिस सेवा पुरवते व दर्जेदार देखभाल पुरविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करते. डायलिसिसची प्रक्रिया कमी त्रासदायक होऊ शकते ही गोष्टीचा त्यांनी धडाडीने पुरस्कार केला आहे व लोकांना या तिची यथार्थता पटवून दिली आहे. आजघडीला भारतातील २० राज्यांतील ११६ शहरांमध्ये नेफ्रोप्लसची २०० केंद्रे आहेत व डायलिसिसवर असलेल्या जगभरातील व्यक्तींना दीर्घ, आनंदी आणि उत्पादक आयुष्य जगणे शक्य व्हावे हे ध्येय घेऊन ही केंद्रे काम करत आहेत. आपल्या गेस्ट्सना दर्जेदार सेवा पुरवण्याचा प्रयत्न नेफ्रोप्लसने नेहमीच प्राधान्याने केला आहे. कंपनीच्या सर्व २०० केंद्रांपैकी प्रत्येक केंद्रामध्ये खास याच कामासाठी नेमलेल्या डॉक्टर्स व परिचारकांची टीम आहे. भारतातील व भारताबाहेरीलही डायलिसिस सेवेची नवी व्याख्या घडविणे हेच ध्येय या कंपनीने सतत बाळगले आहे. 

या कार्यक्रमासाठी नोंदणी, संपर्क करण्यासाठी किंवा वेबसाइटवर लॉग ऑन करण्यासाठी:

https://www.nephroplus.com/initiatives/dialysis-olympiad/