हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

845

पुणे प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर मधील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खंडणीचे पैसे न दिल्यास हॉस्पिटल बॉम्ब ने उडवण्याची  धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. नोबल हॉस्पिटलला धमकीचे तीन मेल  आलेेले आहेत .दिनांक 29 , 30 आणि 7 तारखेला मेल आलेत आहेत. मेलमध्ये बॉम्ब सदृश्य चित्र आहे. यासोबतच विल्यम नावाच्या व्यक्तीने हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचे मेल केले आहेत.यामुळे हॉस्पिटल परिसरामध्ये खळबळ उडाली. या मेलमधून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नोबेल हॉस्पिटलकडे धाव घेतली. पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून हॉस्पिटलची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र बॉम्ब किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. हॉस्पिटल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.व 12 तरखेला राष्ट्रपतींचा पुणे दौराच्या पाश्वभूमीवर बॉम्ब स्फोटाचे मेल आल्याने पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.