रोजलँड शाळेत बालगोपाळांची गोकुळाष्टमी साजरी

961

श्रीकृष्ण व राधेच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

पुणे प्रतिनिधी

पुणे शहर कोंढवा परिसरातील रोजलँड इंग्लिश मीडियम शाळेत बाळगोपाळांचा गोकुळाष्टमीचा सोहळा रंगला होता. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात चिमुकले राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत दाखल झाले. श्रीकृष्णाच्या वेशभुषेत असलेल्या विद्यार्थ्याने हदीहंडी फोडत हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणानला. या सोहळ्या निमित्त संपूर्ण शाळा सजवून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

श्रीकृष्ण व राधेच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शाळेच्या पटांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती. श्रीकृष्ण संगीताच्या तालावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडत गोकुळाष्टमी साजरी केली. यावेळी रोजलँड इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका सैफिया शेख, सोनाली तांबे, तरन्नुम, जरीना पटेल सर्व शिक्षकांसह, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.