रासप चा विधानसभा परिवर्तन मेळावा संपन्न

1626

ज्ञानेश्वर पोले

येथील सारङा मंगल कार्यालयात मा.विनायक भिसे पाटिल यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या व मराठा शिवसैनिकाच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचा कळमनुरी विधानसभा परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याची सुरुवात रॉली ने झाली.शहरात भव्य अशी राँली काढली व या रॉलीचे रुपांतर मेळाव्यात झाले.या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा कार्याध्यक्ष तथा मराठा शिवसैनिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.विनायक भिसे पाटिल, रासप चे प्रदेश सरचिटणीस मा.सुरेशदादा बंङगर,रासप चे जिल्हा संर्पक प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मा.पंढरीनाथ ढाले,मराठा शिवसैनिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष मा.पांङूरंग गोरठेकर,कार्याध्यक्ष मा.पप्पू चव्हाण,मा.रामदास अवचार,मा.वसंत मस्के,मा.अँङ प्रदिप कवङे,मा.विठ्ठल गाभणे,मा.मधूकर कुरुङे,मा.पठाण मा.पंजाबराव गव्हाणकर सर यांच्या सह अल्पसंख्याक आघाङी, महिला आघाङीचे पदाधिकारी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.मा.विनायक भिसे पाटिल आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की,कळमनुरी विधानसभेची जागा जर रासप ला सुटली तर मी विधानसभा लढवणार आहे.आणि माझा जर विधानसभेवर विजय झाला तर कामचुकार अधिकार्याची खैर केली जाणार नाही.2014 मध्ये भाजप-रासप युती होती युतीत ही जागा रासप ला सुटली होती.यावर्षी महायुतीतून ही जागा कोणाला सुटते याकङेच आमचे लक्ष आहे.महायुतीतून जर जागा रासप ला सुटली नाही तरी रासप चे संस्थापक अध्यक्ष मा.महादेव जानकर साहेब जे आदेश देतील त्याचे आम्ही पालन करु.पूढे त्यांनी कार्यकर्ताना संबोधन करतांना निष्ठावंत कार्यकर्ता कशा असतो याविषयी बोधकथेच्या माध्यमातून आपले विचार मांङले.सर्वसामान्याचे प्रश्न सोङविताना माझ्यावर अनेक केसेस झाल्यात तरीही मी ङगमगलो नाही,आणि याची आता सवय लागली आहे.काही दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे,त्यामुळे सोशल मिङियावर कोणतीही पोस्ट टाकतांना काळजीपूर्वक टाका असे कार्यकर्ताना सांगितले.या सोबत उपस्थित पदाधिकार्यानी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.पंढरीनाथ ढाले यांनी केले तर सुत्रसंचालन मा.बळीराम कल्याणकर यांनी केले.या कार्यक्रमाला मराठा शिवसैनीक संस्थेचे व रासप चे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिद्दी पाटिल,शाईनभाई,शेख सलमान,सचिन बोराळे,मंगेश बोराळे,सदाम शेख,कृष्णा नलगे,सुरेश जाधव,यशवंत पाबळे,शिंदे आदि ने प्रयत्न केले