आळंदीत भाजीपाला किराणा दुकाने एक पर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश  

557

अर्जुन मेदनकर, आळंदी 
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आळंदी शहरातील सर्व भाजीपाला विक्री,किराणा माल विक्रीस २ एप्रिल २०२० पासून सकाळी ७ ते दुपारी १ या काळात परवानगी देण्यात आली आहे. यानंतर दुकाने सुरु राहिल्यास आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कायदशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.  .
खेड तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रक प्रमुख सुचित्रा आमले  व उपप्रमुख आपत्ती व्यवस्थापन सदस्य सचिव तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी हे आदेश दिले आहेत.
हे आदेश २ एप्रिल पासून पुढील आदेश होई पर्यंत कायम राहणार आहेत. आळंदी किराणा माल घरपोच सेवा सुरु आहे. नाहक रस्त्या होत असलेली गर्दी व रहदारी टाळण्यास उपाय म्हणू आदेश काढण्यात आले आहेत. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. तसेच साठेबाजी होऊ नये आणि नियमित पुरवठा सुरु रहावा यासाठी या आदेशाचा उपयोग होणार आहे.
दुपारी एक नंतर दुकाने सुरु राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

आळंदी मंदिर १४ एप्रिल पर्यंत दर्शनास बंद रहाणार
कोरोना व्हायरस उपचार केंद्रास आळंदी देवस्थान तर्फे १० लाख
आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय १८ ते ३१ मार्च या कालावधी साठी पूर्वी घेतला होता. मात्र देशातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत केंद्र सरकारने देशात लॉक डाऊन जाहीर केलेले असल्याने आता आळंदी देवस्थानने 31 मार्च ऐवजी १४ एप्रिल पर्यन्त माउली मंदिर भाविकांचे दर्शनास बंद राहणार असून मंदिरातील श्रींचे नित्य उपचार,पूजा परंपरेने सुरु रहाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
ससून रुग्णालय कोरोना व्हायरस उपचार केंद्रास आळंदी देवस्थान तर्फे १० लाख
पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाने केलेल्या आवाहन प्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पुणे ससून रुग्णालयात कोरोना व्हायरस उपचार केंद्र प्रभावी पणे विकसित करण्यास आळंदी देवस्थान तर्फे १० लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. ही रक्कम आरटीजीएस ने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कीर्तनकार ,प्रवचनकाराना आवाहन
देशात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, फडकरी, गायक, संगीतकार यांनी आपापल्या शिष्य परिवारास आवाहन करून घरी राहा, सुरक्षित राहण्यास आवाहन करण्याचा संदेश दिला. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सर्वानी घरी राहून राज्यातील प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन केल्यास कोरोनाचे संकट दूर होईल असे त्यांनी सांगितले. यापूर्वी जाहीर केले आहे. यापूर्वी आळंदी मंदिर ३१ मार्च पर्यंत दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मंदिर बदललेल्या परिस्थितीमुळे १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. त्यापुढील निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने आळंदी मंदिर समितीने देखील १४ एप्रिल पर्यन्त मंदिर दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.मात्र मंदिरातील नित्य नैमित्तिक धार्मिक पूजा.,पूजा विधी उपचार सुरू रहाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

आळंदीत अन्नसेवेचा उपक्रम कौतुकास्पद
आळंदीत मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन मुळे अडकलेल्या लोकांची सोय करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्षा मीरा पाचुंदे ,मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या माध्यमातून आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ व श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे बेघर व स्थलांतरितांचा निवारा केंद्र विकसित करण्यात आले. येथील तात्पुरत्या स्वरूपात राहणा-या लोकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून आंघोळीच्या साधनांचे वाटप करण्यात आले आहे. या शिवाय आळंदी देवस्थान ने सर्व बेघर,स्थलांतरित,लॉकडाऊन ने अडकलेले नागरिक,कामगार यांना स्वच्छतेस टॉवेल व साबण वाटप केले.येथील विविध सेवाभावी संस्थांच्या तसेच दानशूर व्यक्ती व नागरिकांच्या सहकार्याने आळंदीत गरजूना मोफत अन्नदान सेवा सुरु करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषद व ग्रामस्थांनीही यासाठी विशेष पुढाकार घेऊन अन्नदान सेवा सुरु केली आहे. आळंदीत एकही जण अन्नाशिवाय राहणार नाही याची दक्षता घेतली जात असून नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर,उपनगराध्यक्षा मीरा पाचुंदे,आरोग्य समिती सभापती सागर भोसले यांच्या माध्यमातून आळंदी निवारा केंद्रात अडचणी दूर करण्यात येत आहेत. येथील अन्नसेवेसाठी मंगळवारी आरोग्य समिती सभापती नगरसेवक सागर भोसले,भैरवनाथ उत्सव संतीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे,खंजिनदार सुरेश दौण्डकर,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,जालिंदर महाराज भोसले,रमेश कार्ले यांनी अत्यावश्यक अन्नदान सेवेचा टेम्पो रवाना केला.
आळंदीत रक्तदान शिबिराचे आयोजन  
राज्यातील रक्तदानाचा तुटवडा लक्षांत घेऊन येथील नगरसेवक सचिन गिलबिले ,नगरसेविका शैला तापकीर,माजी नगरसेवक दिनेश घुले,अविनाश तापकीर,संदेश तापकीर,सचिन काळे,दीपक काळे,बापू कुऱ्हाडे,अजय तापकीर आदींनी विशेष परिश्रम घेऊन शिबिराचे आयोजन केले. यावेळी होम ब्लड बँकेच्या वतीने शिबिरार्थींचे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी गर्दी टाळून रक्त संकलन करण्यात आले. यासाठी जनजागृती माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केली. रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळातयाचे माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी सांगितले.