क्षयरोग दिनानिमित्त क्षयरुग्णांना पूरक आहार योजना

521

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

सदर योजनेअंतर्गत आधार शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही ड्रग रेझिस्टंट क्षयरोग झालेल्या गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार कालावधीत पूरक आहार(खजूर, गुळ, शेंगदाणे,दूध व प्रोटीन पावडर)पुरविणार आहेत.सदर रुग्णांना औषधोपचार हा जिल्हा क्षयरोग केंद्र मार्फत मोफत दिला जातो व त्यासोबत पूरक आहार मिळाल्याने सदर रुग्ण औषधोपचाराला जास्त चांगला प्रतिसाद देतील व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. यावेळेस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अति.जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.सातपुते, डॉ. शिवाजी राठोड, डॉ. अजय विंचुरकर,शिरीष भोजगुडे संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदना रघुवंशी,प्रा.मुकेश रघुवंशी,प्रा.बी.जे.पावरा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल वळ्वी,समुवेल मावची, रामचंद्र बारी,पुनम मराठे, अनिल पाटील, जयंत पाटील,नंदकिशोर पाटील,विशाल वारुळे, महेश सोनी,अनिल जैन, अनिल लोखंडे,गणेश भावसार,बी.जे.वळवी, अतिश दराडे, पूनम कासार यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मेघा खारकर यांनी केले.