7 वा वेतन आयोग शिक्षकांना विनाविलंब तात्काळ लागु करा

866

इम्राहीन शेख,बुलडाणा

अन्य क्षेत्रातील कर्मचारी यांना ज्याप्रमाणे 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली अगदी त्याच धर्तीवर शिक्षणक्षेत्रात कार्यरत कर्मचारी यांना विनाविलंब तात्काळ 7 व्या वेतन आयोगाचा लाभ द्या,पात्र ठरविण्यात आलेल्या राज्यातील 1723 कनिष्ठ महाविद्यालयाच्या याद्या तात्काळ निधीसह जाहिर करुन पात्रतेसाठी असलेली पटसंख्येची अट शिथिल करुन पटसंख्येअभावी वंचित ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना सुद्धा अनुदानापासुन वंचित ठेवू नका. आचारसंहिता लागु होण्यापुर्वी अघोषित व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांच्या याद्या निधीसह घोषित करा तसेच सैनिकी शाळांमधिल कर्मचा-यांचे मासिक वेतन 469 या एकाच लेखाशिर्षा मार्फत अदा करा अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांना केली आहे.
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी आज मंत्रालय गाठुन शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब यांची भेट घेतली व त्यांना ह्या मागण्या केल्या आहेत. यावर विनाविलंब शिक्षकांना न्याय देण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांनी दिले आहे.
शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत 2777 कमवीच्या याद्या पाठविण्यात आल्या मात्र पटसंख्ये अभावी 1723 कमवी शाळा घोषित होणार असुन 1054 कनिष्ठ महाविद्यालये घोषित होण्यापासुन वंचित राहणार आहेत. असे झाल्यास एवढ्या वर्षापासुन विद्यादानाचे पवित्र कार्य करणा-या शिक्षक बांधवांवर अन्याय होइल यासाठी कमवीच्या पटसंख्येची अट शिथिल करा. सैनिकी शाळांमधिल कर्मचारी यांचे वेतन वेगवेगळ्या हेड खाली होत असल्यामुळे कोणाला कधी? तर कोणाला कधी? मासिक वेतन मिळत असुन ह्या सर्वांचे वेतन 469 या एकच लेखाशिर्षामार्फत करा,आचार संहिता लागल्यास अघोशीत व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या घोषित होण्यामध्ये अडसर निर्माण होइल करिता आचार संहिता लागण्यापुर्वी अघोशीत व नैसर्गीक वाढीच्या तुकड्या निधीसह घोषित करा अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे.
यावेळी 20% अनुदानित शाळांवरील शिक्षकांना शाळा 100% अनुदानावर आल्याशिवाय अतिरिक्त ठरवू नये तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली. आयुक्त कार्यालया मार्फत 2777 कमवी ची यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यातील कार्योत्तर मान्यता धरून 1723 कमवि च्या याद्या लवकरच जाहिर होणार आहे.यावेळी कमवि शिक्षक पदाची पात्रता असणा-या माध्यमीक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदी पदोन्नती द्या,1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करा,6 व्या वेतन आयोगाचे थकित असलेले 5 हप्ते रोखीने द्या, 1628 तसेच 1 व 2 जुलै रोजीच्या शाळांसाठी विनाअट सरसकट 60% अनुदानाची तरतूद करा अश्या मागण्या शेखर भोयर यांनी केल्या आहेत.
शैक्षणिक सत्र 2015- 16 मध्ये शिक्षकांना समयोजीत शाळा मिळुनही संस्थाचालक यांनी तब्बल 6 ते 8 महिन्यानंतर रुजु करुन घेतल्यामुळे तसेच या कालावधीत पुर्वीच्या शाळांनी कार्यमुक्त केल्यामुळे सेवखंड निर्माण झाला आहे. यात शिक्षकांची काहीही चुकी नसुन हा कालावधी सेवाकाळ म्हणून मान्य करुन सेवाखंड क्षमापित करण्यात यावा अशा विविध मागण्यां बाबत यावेळी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा पार पडली.