प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रस्त्यात ट्रक अडकला

786

गणेश जाधव,कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा परिसरात असलेल्या मुख्य बसस्थानकाजवळ संन्मित्र बँकेसमोर आज अवजड मालवाहु ट्रक रस्त्यामध्ये अडकला.
रस्ता खचल्याने मालवाहू ट्रकचे मागील चाक खचलेल्या खड्ड्यात रुतून बसले व बराच काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोंढव्यातील मुख्य बस स्थानक हे अपघात दुर्घटनेचे तळच बनले आहे की काय? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे ,वारंवार होणाऱ्या अपघाताबद्दल लोकप्रतिनिधी , महापालिका प्रशासन ,वाहतूक विभाग ,पोलीस प्रशासन यास जबाबदार आहे असे स्थानिकांचे मत आहे .
येथे कोणत्याही प्रकारे वाहतूक व्यवस्थेची कोंडी सोडवण्यासाठी उपायोजना नसल्याचे स्थानिकांकडून कळाले .
मुख्य बस स्टॉप लगत प्रवासी, विद्यार्थी , महिला वर्ग यांना रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ पाहतोय. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे स्थानिक जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.अशा प्रकारचे कोणतेही अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे असे स्पष्ट मत स्थानिक नागरिक देवदास लोणकर यांनी व्यक्त केले.