14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम व बिअर शॉपी बंद,मद्य विक्रीस पूर्णपणे ‘बंदी’

590

पुणे प्रतिनिधी

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 243 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे या दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे, त्यानुसार राज्यात वाईन शॉप,-परमिट रुम, व बिअर शॉपी, 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत राज्यात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख 14 एप्रिलपर्यंत करण्याचे ठरविले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. यासाठी 14 एप्रिलपर्यंत सर्व मद्याची वाईन शॉप,-परमिट रुम, व बिअर शॉपी, बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती.मात्र राज्य सरकारने यावर कडक नियमावली केली आहे आणि 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार करीत आहे.