बोहरा मुस्लिम समाजाच्या ईदच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शुभेछा

221

पुणे प्रतिनिधी

दाऊदी मुस्लिम बोहरा समाज ईद चा सण मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला . शहरात ‌मशीद, सैफी मशीद यांसह अन्य दाऊदी बोहरा समाजाच्या मशिदींत विशेष मजलिस घेण्यात आली. याशिवाय एकमेकांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा च्या वतीने मा.आ. महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मा.नगरसेवक भरत चौधरी व युवानेते प्रसाद बाबर यांनी कोंढवा खुर्द येथील फखरी हिल येथील मशिदीतील बोहरी समाजाचे धर्मगुरू यांची भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
देशात समाजात शांती व स्थैर्य नांदो, अशी प्रार्थनाही करण्यात आली. रमजानच्या संपूर्ण महिना तरावीहची विशेष नमाज; तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्‍वी आयोजनासाठी समाजा बोहरा समाजाच्या वतीने ईदच्या निमित्ताने बोहरा समाजाचे धर्मगुरू यांचा संदेश समाज बांधवांपर्यंत पोचविण्यात आला. त्यांनी दैनंदिन जीवनात धर्माचे अवलंब करून आपले जीवन अधिक सुख व समाधानकारक करण्याचा संदेश दिला. मान्यवरांचेही आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. लहान मुलांनी आलीम सहाब आणि घरातील ज्येष्ठांची भेट घेऊन ईदचा सण साजरा केला.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक भरत चौधरी यांनी सर्व दाऊदी समाजाच्या नागरिकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाच्या शुभेछा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.