उंड्रीतील सोसायटीच्या पाठिंब्याबरोबर सुनेत्रा ताईंचा विजय निश्चित; जयश्री पुणेकर

648

अनिल चौधरी , पुणे

 उंड्रीसह बारा गावे महापालिकेत समाविष्ठ होऊन सात वर्ष झाले तरी पालिकेने गावांना पाणीपुरवठा , ड्रेनेज तसेच तस्तम सुविधा दिल्या नाहीत. मात्र राज्याचे उपमुखमंत्री अजितदादा पवार यांनी उंड्रीसह इतर गावांना निवडणुकांनंतर पाणी पुरवठा सह इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यामुळे भूमी स्प्रिंग टाउन सह इतर सोसायटीच्या नागरिकांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या सुनेत्रा पवार याना पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा जयश्रीताई पुणेकर यांनी सांगितले.

भूमी स्प्रिंग टाउन सोसायटी मध्ये झालेल्या  उंड्री परिसरातील सर्व सोसयट्या त्याचे सभासद, चेयरमन तसेच नागरिक यांच्या मीटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पी डी सी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गंडे  तसेंच तालुका अध्यक्ष प्रशांत भाडळे, युवा अध्यक्ष राकेश कामठे, वसंत कड पुणे जिल्हा महिला उप अध्यक्ष जयश्री ताई पुणेकर, माजी ग्राम.पं. सदस्य गौरी फुलावरे माजी ग्राम. प. सदस्य अक्षय फुलावरे, डॉ खिलारे, शशिकांत पुणेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम फुलावरे,माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पुणेकर,उंड्री अध्यक्ष प्रिया शेंडकर, सचिन गावडे, ग्रीनपाम सोसायटी चेअर मन अंबुस्कर, प्लाझो चेअर मन मनोज कवटे, रेखा कदम, अरविंद सोनावणे, हिल्स अँड डेल्स समिती मेंबर विवेक खत्री, साईगंगा समिती मेंबर रिटा रंजणकर, तेजस्विनी कुंभारकर, दीपा गुरूंग, प्रेमा.उंड्री तील सर्व रहिवाशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप) गटाला पाठींबा दिला . यावेळी  दुर्गाडे  यांनी पाण्या विषयी सर्व माहिती रहिवाशांना दिली… भविष्यात आम्ही पाणी कशा पद्धतीने देणार आहोत याची उपयुक्त माहिती दिली ,  बाकी चा कामाचा आराखडा आमच्या कडे तयार आहेआचार संहिता संपली कि लगेंच आम्ही कामा च्या मागे लागणार आहे तुमच्या सर्व कामाची पूर्तता आम्ही करणार आहोत असेही दिगंबर दुर्गडे म्हणाले . याप्रसंगी आभार वसंत कड यांनी मानले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत जयश्री पुणेकर व शशिकांत पुणेकर यांनी व्यक्त केले.