Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणे"महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया शहराध्यक्षपदी अनिल मोरे यांची निवड...

“महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया शहराध्यक्षपदी अनिल मोरे यांची निवड…

पुणे प्रतिनिधी,

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया पुणे शहराध्यक्षपदी अनिल मोरे यांची निवड करण्यात आली.नियुक्तीचे पत्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात देण्यात आले.
यावेळी संदीप भटेवरा, जिल्हाध्यक्ष समीर देसाई, रमेश निकाळजे, स्वप्निल कदम, रागिनी सोनवणे उपस्थित होते.
अनिल मोरे 24 वर्ष पत्रकारितेमध्ये काम करत असून त्यांनी विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे, सध्या रोखठोक महाराष्ट्र न्यूज वेब चैनल चे संपादक असून त्यांचा पत्रकार क्षेत्रातील दांडगा अनुभव संघटनेच्या विस्तारीकरणात कामात येईल, डिजिटल मीडिया विभागाची बांधणी, याबरोबरच पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कार्यरत राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले.

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये हजारो युवक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपला चरीतार्थ चालवतात, शासनाकडून नोंदणी करण्यासाठी अद्याप योग्य त्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत, पत्रकार संरक्षण कायद्याच्या कक्षेत डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना घ्यावे तसेच नोंदणी कामी शासनाने पावले उचलावीत, पत्रकारांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आगामी काळात काम करणार आहे. प्रदेशसंघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम वाढवण्यासाठी कार्यरत राहणार.
अनिल मोरे
नवनिर्वाचित शहराध्यक्ष – डिजिटल मीडिया
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!