श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करणे हे कायमच माझे स्वप्न होते : तब्बू

1087

प्रतिभा चौधरी, पुणे :-

-श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करणे हे कायमच माझे स्वप्न होते, परंतु आतापर्यंत ते होऊ शकले नव्हते. ‘अंधाधुन’मधील माझी भूमिका इतकी आव्हानात्मक असेल असे मला वाटले नव्हते. श्रीराम राघवन यांची चित्रपटाची भाषा अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खूप काही शोधण्याची संधी होती. या चित्रपटाच्या गोष्टीत प्रत्येक क्षणी काही ना काही बदलत असल्यामुळे यातील माझी भूमिका साकारणे खूप अवघड होते. ती एखाद्या रेखाचित्रासारखी न वाटता प्रेक्षकांना विश्वास ठेवावासा वाटेल अशी वाटायला हवी होती.

-‘मकबूल’ आणि ‘अंधाधुन’ या माझ्या भूमिकांमधील स्त्रिया ‘मॉरली करेक्ट’ विचार करणा-या नव्हत्या, इतकाच त्यातील समान धागा आहे. परंतु ‘मकबूल’मधील स्त्री काय दिशेने विचार करते आहे हे प्रेक्षकांना दिसत असते, ‘अंधाधुन’मध्ये मात्र त्यांना ते माहीत नसते.

–   ‘मदर इंडिया’, ‘मुघले आझम’, ‘बंदिनी’, ‘सुजाता’, ‘चारुलता’ हे चित्रपट व त्यातील स्त्री भूमिका मला खूप भव्यदिव्य वाटतात. त्या काळी या लोकांनी ज्या ‘पॅशन’ने चित्रपट बनवले त्यामुळेच हे चित्रपट प्रेक्षकांना इतके भावले.

-‘अंधाधुन’च्या चित्रिकरणाच्या माध्यमातून पुणे पाहता आले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

श्रीराम राघवन-

-‘अंधाधुन’ चित्रपटात आम्ही चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे. प्रेक्षक त्यातून १-२ वेगळे शेवट शोधतील असे मला वाटले होते, पण प्रेक्षकांशी बोलल्यावर अनेकांनी अगदी ७-८ वेगवगळे शेवट शोधले होते. त्यामुळे हा चित्रपट आता प्रेक्षकांचा झाला आहे.

-प्रेक्षकांना गोष्ट सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही कारण प्रेक्षक खूप बुद्धिमान असतात. प्रेक्षकांना कळेल का नाही हा विचार करून त्यांना चमच्याने भरवणे ही वाईट गोष्ट आहे.

-माझे शिक्षण पुण्यात सेंट विन्सेंट शाळेत आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात व एफटीआयआय संस्थेत झाले. त्यामुळे पुणे माझ्या जवळचे आहे. ‘अंधाधुन’चे चित्रीकरण पुणे, पाँडिचेरी किंवा पणजीत करावे असा विचार होता, पण मला पुण्याचे रुप पूर्णतः बदलण्यापूर्वी येथेच चित्रीकरण व्हावे असे वाटत होते.

– नव्याने प्रदर्शित झालेल्या राजकीय स्वरूपाच्या चित्रपटांबाबत श्रीराम राघवन यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी थेट भाष्य न करता मी हे चित्रपट पाहिलेले नाहीत. परंतु ते प्रदर्शित झाले असून कशी कामगिरी करतात ते पाहायला हवे, असे त्यांनी सांगितले.