अनिल चौधरी, पुणे
मराठी बिग बॉसची पहिली विजेती मेधा धाडे आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते ‘लेन्स क्वीन’ नावाचे नववर्षाचे सुंदर कॅलेंडर नुकतेच लाँच करण्यात आले. यावेळी सिद्धी फिल्म्सचे संदीप इंगळे आणि विक्की गौतम हेही उपस्थित होते. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यात सुनील पाल, रवी त्रिपाठी आणि यु.बी.चे वसंत भंडारी यांचाही प्रामुख्याने समावेश होता. भारतातील सर्वांगसुंदर अशा १० मॉडेल्स या कॅलेंडरवर दिसतात. अलीकडे कुठल्याही कॅलेंडरवर अभद्र आणि अंगप्रदर्शन करणारी छायाचित्रे असतात. पण सिद्धी फिल्म्सने राजस्थानच्या नयनमनोहर लोकेशन्सवर या सुंदर मॉडेल्सचे छान फोटो काढण्यात आले आहेत. या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील प्रत्येक महिन्याचे पान एक विशिष्ट कहाणी सांगणारे आहे. कॅलेंडरसाठी सारिका जैन यांनी स्टायलिंग केली आहे, तर मेकअप कल्पेश जोशी, सलमा सय्यद एवं प्रकाश दिबवकर यांनी केला आहे. या कॅलेंडरची संकल्पना व छायाचित्रण मनोज जैन यांचे आहे. रोहन, समीर, मेघा आणि ब्लू स्क्वेयरच्या टीमने हे कॅलेंडर डिझाइन केले आहे. या अप्रतिम कॅलेंडरसाठी रश्मी रेखा, स्मिता रे, मधुरा दासगुप्ता, जारा सिद्दीकी, आयरा कतरे, झोया झवेरी, ऋतिक गुलाटी, मनीषा कहुशल, कायरा नायडू आणि अश्माया यांनी मॉडेलिंग केली आहे.