गिरीश भोपी,
पनवेल / प्रतिनिधी : नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली गावात छापा मारुन सुमारे पावणे दोन लाख रुपरे किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केलाआहे. यावेळी गांजा विकणारा लहू नामा कडव (55) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कळंबोली गावात राहणारा लहू कडव हा आपल्या घरासमोर गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असल्राची माहिती मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे व त्यांच्या पथकाने वरिष्ठपोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली गावात छापा मारला. यावेळी लहू कडव याला पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने आपल्या जवळ असलेला गांजा त्याच ठिकाणी टाकून पलायन केले. यावेळी पोलिसांनी लहूने टाकून दिलेल्या वस्तुंची तपासणी केली असता त्याठिकाणी 10 किलो 365 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी सदर गांजा जप्त करुन पळून गेलेल्रा लहू कडव याच्यावर एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या नेरुळ मधील तीन व्यक्तीवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतलेआहे. या तीघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.