Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीकोंढवा पोलिसांनी घेतले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

कोंढवा पोलिसांनी घेतले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

अनिल चौधरी , पुणे

 कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी भारती विद्यापीठ  हॉस्पिटल यांच्या साह्याने “ आपत्कालीन वेळी रुग्णाला मदत “ या विषयावर प्रथमोपचार व सी.पी.आर. चे प्रशिक्षण आणि  प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   या प्रशिक्षणामध्ये रस्त्यावरील अपघात व रुग्णाला येणारा ह्रदयविकाराचा झटका आणि यावेळी रुग्णाची होणारी अवस्था अशावेळी रुग्णावर तातडीने कसे उचार करावेत याबाबत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.  नागरिकांमध्ये ९८टक्के नागरीकांना रुग्णाला तातडीने मदत सी.पी.आर. (Cardio Pulmonary  Resuscitation)  कसा द्यावा ह्याबाबत माहिती नसते याचे देखील प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले.

   पोलीस कायमच अपघाताच्या वेळी उपस्थित असतात हि महत्वाची बाब लक्षात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

          भारती विद्यापीठ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनिया अन्गीहोत्री ,डॉ. उत्सव माने, डॉ.सुषमा श्रीयान, डॉ. अश्विनी घाटगे, श्री.शिरीष कुलकर्णी आपत्कालीन विभागाचे व्यवस्थापक मानसिंग चव्हाण या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना प्रशिक्षण दिले. यावेळी कोंढवा पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!