साविञीच्या लेकींची शिक्षणासाठी पायपीट

812

पुरंदर प्रतिनिधी , पुणे

सावित्रीच्या मुली आजही शिक्षणासाठी दहा दहा किलोमीटर पायपीट करत  असतानाचे चित्र पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात दिसत आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

कात्रज आगारातून खेडशिवापूर गराडे सासवड या मार्गावरून पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गराडे ,कोडीत, बांदलवाडी, सोमर्डी यांसह दुरकरवाडी ,वारवडी ,थापेवाडी, मठवाडी याभागातुन रोजगारासाठी खेडशिवापुर कडे जाणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे.तसेच या भागातून  शालेय विद्यार्थी -विद्यार्थींनी गराडे सासवड या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात ये जा करतात.मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने येथील विद्यार्थ्यांना पाच पाच किलोमीटर पायपीट करून गराडे येथे यावे लागते. सासवड हे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने या भागातून ज्येष्ठ नागरिकांना आठवडाभराच्या बाजारासाठी किंवा  दवाखाना हॉस्पिटल साठी सासवड या ठिकाणी यावे लागते. या भागात एस.टी येते परंतु तिचा वेळ  ठराविक नसल्याने या भागातील शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी वेळेअभावी प्रतिक्षा न करता ऊन पावसात  पायपीट करताना दिसते.

खेडशिवापूर गराडे कोडीत सासवड यांना जोडणारा  या रस्त्यासाठी ४ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागातील रस्त्यांसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घसघसीत निधी मंजूर झाला. विमानतळाच्या पार्श्वभूमी वर तालुक्यातील जोडणारे तीन राज्य मार्ग आणि तीन प्रमुख जिल्हा मार्गाची कामे करण्यात येणार असल्याची घोषणा मार्च २०१८ मध्ये करण्यात आली होती.त्यामध्ये खेडशिवापूर गराडे कोडीत सासवड हा एक मार्ग असून या मार्गावरून कात्रज आगारातून पीएमपीएल बससेवा सुरू झाल्यास या भागातील नागरीकांची मोठी सोय होईल.व पीएमपीएल प्रशासनास मोठे उत्पन्न वाढ होईल.