Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीअभिनेता सुबोध भावे घेऊन येतोय “लाखांची गोष्ट“ !

अभिनेता सुबोध भावे घेऊन येतोय “लाखांची गोष्ट“ !

अनिल चौधरी, पुणे :- 
शुअर वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या संस्थेचे प्रवर्तक श्रीहरी धर्माधिकारी आणि अनघा मोडक यांच्या संकल्पनेतून सामान्यज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा “लाखांची गोष्ट” या राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन मार्च महिन्यापासून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधून हा स्पर्धात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजिका अनघा मोडक, अभिनेता सुबोध भावे आणि लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन भावे यांच्या हस्ते करण्यात आले.

सामान्य ज्ञानाच्या आधारावर सर्वसामान्य जनता तसेच निम्न आर्थिक स्तरातील लोकांनाही लखपती होता येईल या भावनेतून हा कार्यक्रम सादर करण्याची कल्पना आयोजक श्रीहरी धर्माधिकारी आणि  अनघा मोडक यांच्या मनात आली.  हा कार्यक्रम मराठी भाषेत सादर होणार असून त्यात सामान्यज्ञानावर आधारीत प्रश्न प्रेक्षकांना म्हणजेच स्पर्धकांना विचारण्यात येतील. प्रत्येक प्रेक्षकाला बक्षिस मिळवण्याची समान संधी असेल. विविध भेटवस्तू आणि विविध रोख रकमांचा बक्षिसांमधे समावेश असलेला, लाखांची गोष्ट हा रंगमंचावरील पहिलाच कार्यक्रम आहे ! रंगमंचावर यापूर्वी असा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. या कार्यक्रमातील सर्वोच्च पारितोषक २५ लाख रुपयांचे असून, प्रत्येक कार्यक्रमात ते प्रत्येक प्रेक्षकाला मिळवता येण्याची संधी आहे. या कार्यक्रमाचे लेखन, आणि दिग्दर्शन मिलिंद शिंत्रे यांचे असून, सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे करणार आहेत.

“लाखांची गोष्ट !” ची वैशिष्ट्ये :

अनेक लोकांना ही संधी मिळावी म्हणूनच एका माणसाला या प्रश्नमंजुषा कार्यक्रमासाठी फक्त एकदाच प्रवेश मिळेल.

प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतून प्रेक्षकांपर्यंत पोचतील. त्यामुळे इतर भाषकही सहभागी होवू शकतील.

प्रयोग जरी महाराष्ट्रातच होणार असले, तरी संपूर्ण भारतातून कुठूनही स्पर्धक या प्रयोगासाठी येऊ शकतो. निम्न आर्थिक स्तरातील लोकांसुद्धा स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या गावापासून ते कार्यक्रमाच्या गावापर्यंतचे रेल्वेचे भाडे दिले जाईल.

प्रत्येक प्रयोगाच्या ८ दिवस आधी त्या त्या प्रयोगाची प्रवेश नोंदणी बंद होईल. प्रवेशोत्सुक लोकांमधून ५०० लोकांची निवड संगणकीकृत प्रणालीतर्फे स्वयंचलित पद्धतीने होईल.

संगणकावरील सर्वात जलद उत्तर फेरी (फास्टेस्ट फिंगर फर्स्ट), द्वितीय आणि अंतिम अशा एकूण ३ फेऱ्या होतील.

प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि तिचे सर्व नियम, अटी आणि पूर्ण रूपरेषा कळण्यासाठी www.lakhanchigoshta.com या संकेतस्थळाला भेट द्यावी याच संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणी चालू झाली असून १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!