पनवेल हाँरीझन पब्लिक स्कूलची दिक्षा सोनार दिग्दर्शित ” हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट” या लघुपटाला नामांकन

1039

 गिरीश भोपी ,

पनवेल :-प्रकृती  इंटरनँशनल फिल्म फेस्टिव्हल कु .दिक्षा सोनार दिग्दर्शित व संकल्पित तसेच न्यु हाँरीझन पब्लिक स्कूल,खांदा काँलनी निर्मित” हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट” या लघुपटाला मानवी हक्क कँटगिरीमध्ये नामांकन ,फेस्टिव्हल सीईसी , नवी दिल्ली ,भारत सरकार युजीसी अंतर्गत आण्णा युनिव्हर्सिटी चेन्नई येथे या महिन्यात दि. २१जानेवारी ते २३जानेवारी दरम्यान होणार आहे. यासाठी प्रकृती इंटरनँशनल फिल्म फेस्टिव्हल चेन्नई येथे निमंत्रित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हल ची संपूर्ण माहिती http://cec.nic.in वर आहे.
“” हिज व्हिजन:जस्ट ए ट्रिब्युट “”हा लघुपट महात्मा गांधी यांच्या१५०व्या जयंतीचे औचित्य साधून
साकारण्यात आले आहे. सदर लघुपट कृष्ठरोग रुग्णावर आधारित असुन कृष्ठरोगावर सकारात्मक बदलाचा महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश हे दाखविण्यात आले आहे
या लघुपटाचे दिग्दर्शन व संकल्पना दिशा कु.दिक्षा सोनार हिची असुन निर्मिती न्यु.हाँरीझन पब्लिक स्कूल खांदा काँलनी नविन पनवेल याचे आहे.तसेच या लघुपटासाठी चित्रण, व संकलन कँमेरामन सिध्देश वाळंजू यांनी केले असुन मार्गदर्शक म्हणून शाळेचे प्राचार्य प्रशांत बुक्कावार,श्रीमती संगिता जगताप व संतोष वाळंजू यांनी केले आहे.या लघुपटासाठी कृष्ठरोग व्यक्तीरेखा शांतीवनातील(नेरे,पनवेल)येथील राजन साखरकर व शांतीवनातील कृष्ठरोग रुग्णांनी  साकारली असुन यासाठी संपूर्ण योगदान कृष्ठरोग निवारण समिती चे विष्णु प्रभुदेसाई व   कृष्ठरोगाबद्दल माहिती राजन साखरकर, कोल्हेसर, निलकंठ कोळी शांतिवन नेरे, पनवेल जि.रायगड यांनी केले आहे.कु.दिक्षा सोनार हिचे शैक्षणिक, सामाजिक व राजकिय स्तरावर कौतुक व अभिनंदनाचा होत आहे.तसेच हाँरीझन पब्लिक स्कूल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र व मैत्रिणीच्या शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.