Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीमाधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन

माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन

अनिल चौधरी, पुणे :-

बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या ‘बकेट लिस्ट’ या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!