ग्रॅविटस फाऊंडेशन आणि हॅलो मॅगझिन प्रस्तुत ऊर्जा अवॉर्ड २०१९ संपन्न…!!!

1043

अनिल चौधरी

उषा काकडे यांच्या ग्रॅविटस फाऊंडेशन आणि हॅलो मासिकाने ऊर्जा अवॉर्ड २०१९ आयोजन केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मनोरंजनविश्वातील अग्रगण्य सेलिब्रिटीजना या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यानिमित्त मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि शिक्षण अशा सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी रविवारी मुंबई उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ऊर्जा अवॉर्ड २०१९ चा पाचव्या सिझनमध्ये आपल्या यशाचा उलघडा केला.
ग्रेविटस फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा उषा काकडे सांगतात, “ऊर्जा अवॉर्डचे हे पाचवे वर्ष आहे. ह्यामुळे आज मला फार आनंद व अभिमान वाटत आहे. समाज हित करण्यासाठी निःस्वार्थ योगदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण आभार मानले पाहिजेत. आपल्या समाजाला जगण्यासाठी एक चांगले स्थान बनविण्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या व्यक्तींचे सतत समर्थन वाढविणे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे मीडिया पार्टनर हेल्लो! यांनी या अवॉर्ड सोहळ्याला समर्थन केल्याबद्दल मी खूप आभारी आहे.”
मनीषा कोइराला, आदिती राव हैदरी, आयुष शर्मा, सरोदसम्राट उस्ताद अमजद अली खान, अरमान जैन आणि मुख्य पाहुणे अमृता फडणवीस, हर्ष गोयंका, उषा काकडे आणि रुचिका मेहता यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.
१४ श्रेण्यांमध्ये हे अवॉर्ड विभाजित केले होते. बॉलिवूडमध्ये केलेल्या योगदानाबद्दल अभिनेत्री आदिती राव हैदरी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी शौर्य पुरस्काराने देण्यात आला तर हरभजनसिंग आणि हिना सिद्धू यांना क्रमशः योगदान क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. आयुष शर्माला बॉलिवूडमधील पदार्पणासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव बजाज यांना बिझनेस लीडर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला तर समाजहितासाठी लक्षणीय कामगिरी करत असल्याबद्दल रुबल नागी यांना सन्मानित केले गेले. नीरजा बिर्ला यांना त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल सुरु केलेल्या जागृकतेमोहिमेसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला . तसेच शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्टत कामगिरीचा पुरस्कार असीम चौहान यांना बहाल करण्यात आला.
स्त्री आणि बाल सशक्तिकरणाच्या पुढाकारासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रेविटस फाऊंडेशनने डॉक्टर फिरोजा पारख यांचा मेडिसिन श्रेणीत सन्मान केला. शौना चौहान सलुजा यांना कॉन्ट्रब्युशन टू कॉरपोरेट एक्सेलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. जगप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे गौरवण्यात आले.

यु.एस.के फाउंडेशनबद्दल थोडक्यात :
ऊर्जा पुरस्कार हा यूएसके फाऊंडेशनचा एक प्रकल्प आहे ज्यामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल सन्मानित करतो. २६ ऑगस्ट २०१४ रोजी आम्ही उर्जा पुरस्काराचा प्रवास सुरू केला. आजवर आम्ही साराभाई वाघमारे (सामाजिक), शीतल चव्हाण (बहारी), विद्या लाढके (व्यवसाय), राही सरनोबत (क्रीडा), अभिनेत्री आशा पारेख (कला) यांना देवेंद्र फडणवीस अशा अनेक दिग्गजांना सन्मानित केले आहे. ९ सप्टेंबर २०१५ रोजी उर्जा पुरस्कारांचे दुसरे  संस्करण झाले ह्यात अरुणिमा सिन्हा (शौर्य), नसीमा हर्जुक (सामाजिक), वीणा पाटील (व्यवसाय), रेशमा माने (क्रीडा), अभिनेत्री हेलन (कला), डॉ. रवींद्र आणि स्मिता कोले (जीवनगौरव) यांना श्रीमती टीना अंबानी (अध्यक्ष कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पीटल) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.