गिरीष भोपी
पनवेल/प्रतिनिधी:
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार वसतिगृहाची कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्य घेण्यात यावेत. यासाठी वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ठाणे येथील अप्पर आयुक्त संजय मीणा यांच्याकडे निवेदन दिले होते. तसेच वसतिगृहाची कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ घेतल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्याने आदिवासी विकास विभागाचे ठाणे अप्पर आयुक्त संजय मीणा यांनी कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र घेण्याकरिता तात्काळ आदेश काढले.
परंतु, वसतिगृहाची कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ झाले नाही तर पैसे कमावणे अवघड होईल आणि स्वतःचे स्टंडबाजी कमी होईल यासाठी काही चमचे व प्रशासनाला अडचणीत आणणारे अधिकारी व वर्षानुवर्षे वसतिगृहात रहाणारे विद्यार्थी यांनी कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ होण्यासाठी आदेश नसताना देखील पोलीस बंदोबस्त घेवून अखेर कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अखेर शनिवार (दि.19) रोजी दोन्ही कार्यक्रम एकञ पार पडले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रमुख मार्गदर्शन डाॅ. संतोष बोराडे, श्री. कल्पेश जाधव, डाॅ. श्रीनिवास सुरपम, श्री. संजय तुंगार, गृहपाल सद्या पर्यायी व्यवस्थेवर असणारे सहाय्यक प्रकल्प श्री. काळपांडे आदी. गृहपाल व विद्यार्थी उपस्थित होते.
माञ, या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी श्री. केंद्रेंनी पाठ फिरवल्याने श्री. केंद्रे का? उपस्थित राहीले नाहीत यांचीच गृहपाल व विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय, वसतिगृह व्यतिरीक्त बाहेरील व्यक्ती कार्यक्रमाला कोणी नसता देखील सुनील तोटावाड हा बाहेरील व्यक्ती कार्यक्रमाला आला कसा? असा प्रश्न आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पडला आहे. तसेच या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाले असल्याची शंका निर्माण होवून कार्यक्रमाची जबाबदारी घेतलेल्या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी वसतिगृहाची विद्यार्थी करीत आहेत.
● कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ होण्यासाठी पर्यायी व्यवस्थेवर असणा-या श्री. काळपांडेनी मागितले गृहपालांकडे पञ…
● विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर..!
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची समन्वय समिती तयार न करताच बाहेरील लोकांच्या सांगण्यावरून कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ घेतल्याने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे, दोन्ही कार्यक्रम एकञ झाल्याने व अप्पर आयुक्त ठाणे यांचे आदेश पालन न केल्याने पनवेल वसतिगृहातीलच जवळपास 250 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला येण्याचे नकार दिला. ऐवढेच नाहीतर अप्पर आयुक्त ठाणे यांच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटले होते की, विद्यार्थ्यांशिवाय बाहेरील एक ही व्यक्ती कार्यक्रमामध्ये नको, कार्यशाळा ही वेळेत घेणं अपेक्षित आहे, मुलींच्या सुरक्षेचा विषय या सारख्या अनेक अटी शर्ती पालन करण्याचे आदेश दिले होते. माञ या अटी, शर्ती तसेच दोन्ही कार्यक्रम एकञ नको या अप्पर आयुक्तांच्या आदेशाला सुद्धा प्रकल्प अधिकारी श्री. केंद्रे व मुळ पदावर असणारे गृहपाल सद्या पेण येथे पर्यायी व्यवस्थेवर असणारे सहाय्यक प्रकल्प श्री. काळपांडे यांनी आदिवासी विकास विभागाचे ठाणे अप्पर आयुक्त यांच्या आदेशाला फाट्यावर मारून दोन्ही कार्यक्रम अखेर एकञ घेतले.
- दोन्ही कार्यक्रम एकञ असे झाले! विद्यार्थ्यांवर कुणाचा दबाव..?
आदिवासी वसतिगृहातील कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम एकञ होण्यासाठी श्री. काळपांडे यांनी प्रकल्पातील सर्व वसतिगृहातील गृहपालांना दोन्ही कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून लेखी पञ घेवून कार्यक्रम फार पाडला. पण बहुतेशः विद्यार्थ्यांचा नकार असताना देखील प्रकल्प कार्यालयाच्या सांगण्यावरून व संबधित गृहपालांच्या दबावामुळे विद्यार्थ्यांनी नाईलाजास्तव पञावर सह्या केल्या असल्याचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून सांगितले जाते