Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपनवेलमध्ये अंमलीपदार्थाचा मोठा साठा हस्तगत

पनवेलमध्ये अंमलीपदार्थाचा मोठा साठा हस्तगत

गिरीश भोपी, प्रतिनधी पनवेल :-

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.22/01/2019 रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरुन ‘‘पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 22/01/2019 रोजी दुपारी 16.00 ते 18.00 वाजताचे दरम्यान जूना पुणे – मुंबई हायवेने पळस्पे  फाटा मार्गे अलिबागकडे जाणा-या दोन चार चाकी गाडया त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची होंडा सिव्हीक कार नंबर एम.एच.12, जी.के. 6930 व दुसरी मारुती सुझुकी डिजायर क्रमांक एम.एच. 14, एच.डी. 9454 अशा दोन्ही गाड्यांमध्ये एक महिला काही पुरुष इसम हे साधारण 100 ते 125 किलो  वजनाचा गांजा व 2-3  किलो  चरस या अंमली  पदार्थाची विक्री करण्या करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र बुधवंत, सपोनि संतोष मुटकमुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, पोहवा/538 सलीम इनामदार, पोहवा/849 ईकबाल शेख, पोहवा 1202/ कासम पिरजादे, पोहवा/292 संजय चौधरी, पोना/2057 सचिन भालेराव, पोशि/3580 बाबा सांगोलकर यांना मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी आदेशित केले असता, आरोपीत नामे १)  चंद्रभागा बाळू भूजबळ, वय 49 रा. वाकड पोलीस चौकीच्या मागे, ता. मुळशी, जि. पुणे, २)  विशाल विदयाधर देशपांडे, वय 27 वर्षे, धंदा- ब बेकार,वाकड, ता. मुळशी, जि. पुणे, मुळ रा. नांदेड ३)  राघव विष्णु शिंदे, वय 27 वर्षे, धंदा- डांयव्हर, रा. मु. डोगंरगण, ता. आष्टी, जि. बीड ४)  अक्षय दादाभाऊ खरपुडे, वय 19 वर्षे, धंदा- टपरी चालक, रा. वाकड, ता. मुळशी, जि. पुणे यांच्या ताब्यात एकुण 47,01,000/-रू. किंमतीचा 108 किलो वजनाचा गांजा व 2 किलो 245 ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ वर नमूद दोन्ही कारमध्ये विक्री व वाहतुक करण्याचे उददेशाने स्वत:चे कैंजात बेकायदेशिररित्या बाळगला म्हणुन त्यांचेविरूध्द एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8 (क)  , 20, 29 अन्वये त्यांचेवर पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ाा 34/2019 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20,29 अन्वये गुन्हा दाखल करणेत आला असुन त्यांना दि. 23/01/2019 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. पनवेल कोर्ट येथे रिमांडकामी हजर केले असता आरोपित यांची दिनांक  28/01/2019 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, नेमणुक अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!