कोंढव्यामध्ये घरफोडी :सोन्या चांदीचे दागिने चोरीला 

914
भूषण गरुड :- 
घरफोडी कडून चोरट्यांनी एक लाख 42 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने व दहा हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दिनांक 24) गुरुवार रोजी 2.30 ते 5.00 च्या सुमारास कोंढवा खुर्द मध्ये घडली.
या प्रकरणी सरवर अयाज खान (वय.31, रा. सर्वे नंबर 354, खान बिल्डींगच्या जवळ, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सरवर खान यांच्या राहत्या घरी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे तब्बल एक लाख बेचाळीस रुपयाचे व दहा हजार रोख रक्कम घरफोडी करून चोरट्यांनी लंपास केले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सह.पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक एस.जी.लोखंडे करीत आहेत.