व्यवसायात मराठी माणसाचा वाढणारा टक्का अभिनास्पद :आ. महेश दादा लांडगे

968

अनिल चौधरी,पुणे

         भोसरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे तसेच अभिनेता नितेश चव्हाण, अभिनेत्री शिवानी बावकर ( अजिंक्य आणि शीतल – लागीर झालं जी फेम ) यांच्या हस्ते ‘मोशी ग्रांड’ या मोशी – देहू रोडवर नुकतेच उभारलेले व सर्वच बबतीत अत्याधुनिक असलेल्या हॉटेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या हॉटेलचे संस्थापक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे त्याच बरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती.

                             या प्रसंगी बोलताना लांडगे म्हणाले, की मोशी – आळंदी रोडच्या आजूबाजूचा परिसराचा सध्या झपाट्याने कायापालट होत आहे. या भागात व्यवसायासाठी सध्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असून या भागात वाढणारी नागरी वस्ती व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी घेवून आली आहे. त्यात मराठी माणसाचा या भागात व्यवसायात वाढणारा टक्का हा अभिनास्पद आहे. मराठी माणूस सध्या या ठिकाणी विविध व्यवसाय करताना दिसत आहे. हॉटेल या क्षेत्रात ठराविकच वर्गाचा सहभाग आहे. मात्र या क्षेत्रात देखील मराठी माणसाचा वाढणारा सहभाग मराठी माणसाला व व्यवसायाला नवसंजीवनी देणारा आहे.

                यावेळी या ‘मोशी ग्रांड’ या हॉटेलचे संस्थापक संतोष बारणे, गणेश जाधव, गणेश कुटे यांनी त्याचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की ग्राहकांना सर्वोतम सेवा देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. तसेच या भागातील खवय्येगिरी ग्राहकांसाठी ‘मोशी ग्रांड’ चांगला पर्याय आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.