अनिल चौधरी,
पुणे – विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहरण झाले. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उत्तम चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शनिवार वाडा येथे ध्वजारोहण
शनिवार वाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उत्तम पाटील, रामदास जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी, तहसिलदार विकास भालेराव, सुनील कोळी, हिरामण गवळी, अर्चना यादव, नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक अनिल आवारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, संजय मधाळे आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.