अनिल चौधरी, पुणे :-
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स फोटोग्राफर आकाश कुंभारने 10 तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड करून विक्रम नोंदवला आहे. १० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे फोटोग्राफ काढणारा आकाश हा पहिलाच भारतीय फिटनेस फोटोग्राफर ठरला आहे. १२ जानेवारीला सकाळी १० वाजून ३० मिनिटानी त्याने ह्या विश्वविक्रमाची सुरूवात केली आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांत तो पूर्णही केला. आणि नुकताच वल्ड इंडिया रेकॉर्ड्सकडून गौरव करण्यात आला.
सूत्रांच्या अनुसार, आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमरवल्डमधल्या आणि स्पोर्ट्सवल्डमधल्या राष्ट्रीय आणि आंततराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओ शूट केलेआहेत. 2018 मध्ये एशिया आणि मीडलइस्टच्या वॉव अवॉर्ड्सने आकाशचा आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर हा सन्मान देऊन गौरव केला होता. ‘बी’ ह्या आंतरराष्ट्रीय लाइफस्टाइल मॅगजीनच्या कवरपेजसाठीतीनदा फोटोशूट केलेला आकाश फॅशनवल्डमधलं मोठं नाव आहे. वर्ल्ड इंडिया रेकॉर्डचे अध्यक्ष पवन सोलंकी म्हणाले,आकाश कुंभार हा जगातील पहिला फिटनेस फोटोग्राफऱ आहे.त्याने १० तासात २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ फोटो काढण्याचा विक्रम केला ह्यासाठी त्याचा वर्ल्ड इंडिया रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले.असून विश्वविक्रम त्याने करावे ह्यासाठी त्याला शुभेच्छा.”
आकाश कुंभार आपल्या विक्रमाविषयी म्हणतो, “मी 2012पासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय. मी अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केले आहे. पण एका दिवसात २७४ मॉडेल्सचे फोटो काढणे हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते.तसेच भारतात फिटनेस फोटोग्राफी विषयी जागरूकता नसल्याचे मला जाणवले. मला हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता आणायची आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकदृष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्या पिढीने पाहावे, ह्यासाठी मी हा विक्रम नोंदवला आहे. ह्याचं श्रेय मी माझ्या आई, वडिलांना तसेच माझ्या मित्रांना देवू इच्छितो. काही दिवसातच मी यूकेमध्ये जाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार आहे.”