Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडकेदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त " युवा चषक २०१९ " चे आयोजन

केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ” युवा चषक २०१९ ” चे आयोजन

गिरीश भोपी, पनवेल 

युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त ” युवा चषक २०१९ ” चे आयोजन दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी पनवेल शहरातील आगरी समाज सभागृह समोरील कन्या शाळा मैदान येथे करण्यात आले होते. विनामूल्य बॉक्स टाईप क्रिकेटचे सामने यावेळी आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रामशेठ ठाकूर साहेब यांनी देखील क्रिकेट खेळून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यांमध्ये पनवेलमधील पत्रकार संघर्ष समिती व पनवेल प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघांमध्ये लढत ठेवण्यात आली होती. हा सामना मैत्रीपूर्ण उद्देशाने खेळविण्यात आला होता. या सामन्यांमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले होते. युवा नेते केदार भगत यांच्या संकल्पनेनुसार खेळविण्यात आलेल्या पत्रकारांच्या सामन्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.

               यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, माजी नगरसवेक लक्ष्मण कुरघोडे, जय महाराष्ट्र व्यायाम शाळेचे संस्थापक यशवंत भगत, भाजपा सरचिटणीस भरत जाधव, उद्योजक नंदकिशोर धोत्रे, पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक महाडिक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव मयूर तांबडे, खजिनदार संजय कदम, सदस्य अरविंद पोतदार, केवल महाडिक, राज भंडारी, वचन गायकवाड़, गिरीश भोपी, रवींद्र चौधरी, प्रेस क्लबचे सदस्य संतोष भगत, शैलेश चव्हाण, विकास पाटील, जितेंद्र नटे, राजेंद्र कांबळे, असीम शेख आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!