पोस्टात विमा प्रतिनिधींची भरती; 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे अवाहन

2907

अनिल चौधरी, पुणे :-                                                                                                         पोस्टाच्या जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असनाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक शिवाजीनगर पुणे ग्रामीण विभाग, अधीक्षक डाकघर यांचे मार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली नमूद केलेल्या अटीची पूर्तता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर यांच्या कार्यालयास दिनांक 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.   

            अर्ज पाठविताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे पाठवावीत शैक्षणिक पात्रता : ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा १० वी पास असावा तसेच ५००० व त्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात राहणारा उमेदवार हा १२ वी पास असणे आवश्यक आहे. वय वर्षे १८ ते ६० कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी / माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार / स्वयंरोजगार असणारे तरुण,तरुणी किवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवारअर्ज पाठवू शकतात.इच्छुक उमेदवारांनी विमा policy विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे.                                                                                                          उमेदवाराची निवड १०वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणीक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.  उमेदवाराने आपले अर्ज रजिस्टर/स्पीड पोस्ट द्वारे साध्या कागदावर शैक्षणिक पात्रता व संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतीसह लीफाफावर “डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची नियुक्ती” असे लिहून अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, पुणे ४११ ००५ यांचे नावे (अर्ज) दि ०९.०२.२०१९ पर्यंत पोहचतील असे पाठवावे.  अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.maharashtrapost.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी, असेही पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी