प्रतिभा चौधरी ,
नानासाहेब पेशवे कात्रज तलावातील मोठ्या प्रमाणावर वाढलेली जलपर्णीचे पूर्णपणे निर्मुलन करण्यात आले असून या कामाकरिता पालिकेच्या आरोग्य विभाग, उद्यान विभाग, यांत्रिकी विभाग, मलनिस्सारण विभागाच्या एकत्रित प्रयत्नाने तसेच या कामात या प्रभागातील नगरसेवक तसेच स्वयंसेवी संस्थाच्या सहभागाने जलपर्णी निर्मूलनाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. जलपर्णी निर्मुलन केल्यानंतर या परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात आली.या कामासाठी महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे.