भूषण गरूड पुणे
पेट्रोलियम कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गँस दरात सलग तिसर्यादा घट केली. अनुदानित सिलिंडरच्या दरात 1.46, तर विनाअनुदानित गँस दरात 30 रुपयांनी घट करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विनिमय दरातील चढ-उतार आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे गँस दरात कपात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याआधी एक डिसेंबर रोजी अनुदानित सिलिंडरमध्ये 6.52, तर एक जानेवारी रोजी 5.91 रुपयांनी घट करण्यात आली होती. तर विनाअनुदानित गँस दरात एक डिसेंबर रोजी 122, तर एक जानेवारी रोजी 120.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. केंद्र सरकारतर्फे वर्षाला 12 अनुदानित गँस सिलिंडरचा पुरवठा केला जातो.