अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याऱ्यास अटक

1017

अनिलसिंग चव्हाण, बुलडाणा :-                                                                                                                   येथून जवळच असलेल्या एळगाव येथे 21 वर्षीय एक मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाने आपल्या घरात टिव्ही पाहण्यासाठी आलेल्या अल्पयीन मुलावरच बलात्कार केल्याची किळसवानी माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे या प्रकरणी युवकास अटक करण्यात आली आहे.                                                                                     यासंदर्भात पोलिस विभाग कडून मिळालेल्या माहिती नुसार, येथून जवळच असलेल्या एळगाव येथील ईश्वर विनोद वीरशीद हा युवक आपल्या घरात टिव्ही पाहत होता. दुपारी सर्व लोक कामाला गेले असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. अल्पयींन 12 वर्षीय  मुलगा दुपारी शाळा सुटल्या मुळे घरी आला होता, त्याचे आई वडील कामाला गेले होते ही संधीसाधुन आरोपी ईश्वर याने सदर मुलास आपल्या घरात बोलाविले. टिव्ही सुरु असतांना दरवाजा लावून घेतला व मुलास चारपाई वर झोपवून अनैसर्गिक संभोग केला. अश्लील चाळे केले सदर घटना घडल्या मुळे सदर मुलगा घाबरला अरोपीने त्याला धमकावले व सदर बाब कोणास ही न संगण्याची तंबी दिली. दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेत गेला नाही, तो रडत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलास विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सर्व घटना कथन केली.                                                                                                                                       या संदर्भात पिडीत मुलाच्या आईच्या तक्रारी वरुन बुलडाणा पोलिसांनी आरोपी विरोधात भां.दं.वि 377 , 504 , 506 ,व पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी ईश्वर याला अटक करण्यात आली आहे. सदर घटने चा तपास पी एस आय संतोष जवंजाळ हे करीत आहे. दरम्यान एळगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.