Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेअसंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड

असंतोषाविरोधात जनसामान्यांचा ‘आसूड

मल्हार न्यूज विशेष

तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवूनप्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठीशिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हेदाखविणारा आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

     

 सामान्य माणूस आणि संघर्ष हे समीकरण आपण वर्षानुवर्ष पाहतोय. समाजात वावरताना नशिबी येणारी हतबलता सामान्य माणसांना बंड करायला प्रेरित करत असते. अशाच एका बंडाची कथा दाखवताना राजकीय नेतेत्यांचे पक्षीय राजकारण, त्यात गुंतलेले आर्थिक हितसंबध, प्रसारमाध्यमं, त्यांची भूमिका आणि त्यातून सामान्यांची होणारी घुसमट दाखवण्याचा प्रयत्न आसूड मध्ये करण्यात आला आहे. शेतकरी कुटुंबातील बीएससी अॅग्रीकल्चर झालेला पण तरीही  शेतीविषयी प्रचंड अनास्था बाळगणारा कथेचा नायक शिवाजी शेती व्यवस्थेचा प्रश्न सोडवायला निघतो. व्यवस्था बदलायला पाहिजे अशा आत्मविश्वासानं लढणारा शिवाजी या बदलासाठी सामदामदंडभेद वापरत शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारत प्रत्येक शेतकऱ्याला कशा पद्धतीने लढाईचा मंत्र देतो याची रोमहर्षक कहाणी आसूड मध्ये पहायला मिळणार आहे.                विक्रम गोखलेप्रदीप वेलणकरमाधव अभ्यंकरअनंत जोगदीपक शिर्के,उपेंद्र दातेसंदेश जाधवकमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूरअवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिकयांनी आसूड च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगमआदर्श शिंदेदिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.     समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा  संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे.                                                              या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथापटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.

 आसूड ८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!