ग्राहकांची व गोयल गंगा इंडिया प्रा.लि बांधकाम व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक

810
भूषण गरूड पुणे :-
पुण्यातील गोयल गंगा ग्लिस्ट गृहप्रकल्पाचे प्रमुख अभिषेक सुरेंद्र गोयल (वय 36, रा. 67, वानवडी. पुणे) या पदावर काम करत असताना. फ्लॅट खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गोयल गंगा चे डायरेक्टर माझे चुलत भाऊ आहेत. असे नातेसंबंध सांगत. या प्रकल्पामध्ये सर्वाधिकार स्वतःलाच असल्याचे सांगत ग्राहकांचा विश्वास संपादन करत फ्लॅट बुकिंगची रोख रक्कम, चेक व ऑनलाइन स्वरूपातील 21 लाख 63 हजार 900 रुपये घेऊन या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून ग्राहकांची व गोयल गंगा इंडिया प्रा.लि. ची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार गोयल गंगा इंडिया प्रा.लि.चे सीईओ सेल्स किरणकुमार ठाकुरदार देवी (वय 58, रा. बिबेवाडी,पुणे) यांनी दिली. त्यानुसार अभिषेक गोयल यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 यादरम्यान अभिषेक गोयल याने गोयल गंगा इंडिया प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे उंड्री पुणे येथील गंगा ग्लिस्ट गृह प्रकल्पाच्या प्रमुख पदावर असताना. फ्लॅट खरेदी करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना तो कंपनीचे डायरेक्टर अतुल गोयल व अमित गोयल यांच्या चुलत भाऊ असल्याचे सांगत व प्रकल्पामधील फ्लॅट बुकिंगची रोख रक्कम स्वीकारण्याचे सर्व अधिकार स्वतःलाच असल्याचे खोटे सांगून. कंपनीच्या वतीने प्रकल्पातील फ्लॅट बुकिंग, खरेदीखत, फ्लॅटच्या मूळ किमतीमध्ये सवलत, क्लब हाऊस ची फ्री मेंबर्शिप देतो असे सांगून ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडून कंपनीच्या सेल्स ऑफिस मध्ये रोख, चेक व ऑनलाइन स्वरूपात 21 लाख 63 हजार 900 रुपये स्वतः घेऊन ग्राहकांना रक्कम स्वीकारण्या बाबत स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये गोयल गंगा लेटर पॅड व चिठ्ठ्यांवर लिहून स्वतःच्या सह्या करून ग्राहकांना दिल्या. ग्राहक ग्राहकांकडून स्वीकारलेल्या रकमा गंगा ग्लिस्ट प्रकल्पाच्या खात्यात जमा न करता व त्याबाबत कंपनीच्या डायरेक्टरांना कोणतीही माहिती न देता सदर रकमेच्या स्वतःच्या फायद्याकरिता अपहार केला. ग्राहकांची व गोयल गंगा इंडिया प्रा.लि.कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार पुढील तपास करत आहेत.