गिरीश भोपी , पनवेल
नियोजित जे एन पी टी च्या प्रवेशद्वारावर छञपती शिवरायांचे शिल्प बसवले जाणार आहे, सदर शिल्पामध्ये रामदास स्वामी यांचा समावेश करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडच्या निदर्शनास आल्यामुळे तेथील शिल्पाला ब्रिगेडने विरोध केला आहे.
मुळामध्ये छञपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा ही भेट झालेली नाही.किंवा रामदासांचे छञपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये काहीही योगदान नाही.येवढेच नव्हे तर रामदास स्वामी हे आदिलशहा आणि औरंगजेबाचे हेर असल्याचे मा.उच्च न्यायालयातील महाराष्ट्र सरकार विरुद्ध मा.म.देशमुख यांच्या “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या ग्रंथावरील केस दरम्यान सिद्ध झालेले आहे. त्यामुळे तिथे बसविण्यात येणाऱ्या शिल्पाला आमचा विरोध आहे.
जेएनपीटी प्रशासन उभारित असलेल्या नियोजित शिल्पामधून आपण रामदास स्वामी यांना छञपती शिवाजी महाराज यांच्या सोबत दाखवून इतिहासाचे विकृतीकरण करुन राष्ट्रीय महापुरुषांचा अवमान करित आहात.किंबहूना एक प्रकारे देशद्रोही कृत्य करीत आहात.
तरी संभाजी ब्रिगेड सदर पञाद्वारे प्रशासनास इशारा देत आहे की, उभारत असलेल्या समुह शिल्पातून छञपती शिवाजी महाराजांच्या सोबत दाखवलेले रामदास स्वामींचे शिल्प तात्काळ हटवण्यात यावे.अन्यथा,आपल्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.व आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.तद्नंतर निर्माण होणार्या परिस्थितीस व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास पुर्णपणे आपण स्वत: जबाबदार असाल असा धमकी
वजा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.