कोंढव्यातील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

1065
भूषण गरूड पुणे :-
कोंढवा परिसरातील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना सहा जणांना गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 5 मे अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख  8 हजार 214 रुपये मुद्देमालासह तीन दुचाकी, दोन कोयते, दोन सत्तुर, एक फाइटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दरोड्याच्या तयारीत अटक केलेले आरोपी ऋषिकेश उर्फ हूक्या श्रीकांत गाडे(वाय 20, रा.अप्पर इंदिरानगर), गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस (वय 27, रा.पर्वती दर्शन), चांद फक्रुद्दीन शेख (वय 20, रा.अप्पर इंदिरानगर), गणेश बाळासाहेब कांबळे (वय 21, रा.सुप्पर इंदिरानगर), सूर्यकांत किसन कोळी (वय 23, रा.घोरपडी पेठ), रोहित तय्यब काझी (वय 28, रा.घोरपडी पेठ)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील एस.के.ऑटो केअर या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आरोपी आहेत. ते ग्रीन पार्क सोसायटीच्या कंपाऊंडच्या भिंती शेजारी उभे आहेत. याची पक्की माहिती गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 5 मिळताच त्यांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी जवळून दोन कोयते, दोन सत्तुर, मिरचीच्या पुड्या, पेपर स्प्रे असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले व तीन दुचाकी आणि 2 लाख 8 हजार 214 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक एस.व्ही.तासगावकर पुढील तपास करत आहेत.