अनिल चौधरी,पुणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाऑनलाईन नवीन सेंटर देने सुरू झाले आहेत, हे सेंटर गेली तीन वर्षे सिएससी मध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सभासदांना देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सिएससी व्हिएलई असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे यांनी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत केले आहे , याबाबतचे निवेदन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पुणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन केली होती. आज सिएससी केंद्र सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवित असतात . पण त्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत शासन दुर्लक्ष करत असते याबाबत कैलास बनसोडे यांनीं आवाज उठविला असून शासनाने त्वरित मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी सिएससी सभासदांना येणाऱ्या अडचणींवर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून त्यांच्या अडचणी समजावून त्यावर तोडगा काढण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
महाईसेवा सिएससी साठी द्या : कैलास बनसोडे
याप्रसंगी कैलास बनसोडे, कविता राठोड, सुहास मोरे, पुनीत धवन, विशाल दिवेकर, लेखना चौधरी, मयूर कदम, श्रीपाद शेळके यांनी मार्गदर्शन केले तर पुण्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सिएससी सभासद उपस्थित होते.