अनिल चौधरी, पुणे ज्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट आल्यावर मराठीच नव्हे तर बॉलिवूडमधील भल्याभल्यांना घाम फुटत असे दादा कोंडके एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होत . सत्तरीचा आणि ऐशींच्या दशकात त्यांचे मराठी सिनेमे तुफान गाजले आणि तेत्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. या दिग्गज अभिनेत्याने आणि चित्रपटकर्त्याने मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ापासून सुरू झालेला ‘त्यांचा’ प्रवासचित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला. अशा दादा कोंडकेंना अप्सरा आली च्यामंचावर मानाचा मुजरा देण्यासाठी दादा कोंडकेंसारखा नकलाकार संदीप गायकवाड ने हुबेहूब दादा कोंडके ना अप्सरा आलीच्या मंचावर उतरवले . बुधवार ते शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान या ९:३० वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर होईल . या एपिसोड मध्ये अप्सरा आली कार्यक्रमाच्या सौंदर्यवती अप्सरा श्वेता परदेशी , ऋतुजा राणे , माधुरी पवार , मानसी शर्मा , ऐश्वर्या काळे , श्रुती भालेकर , पायल , आणि किन्नरी यांनी दादा कोंडकेंच्या गाण्यांवर नृत्य सादर केली आहेत . या कार्यक्रमात प्रेक्षकांना भारतीय आणि सालसा , लावणी आणि जॅझ , भारतीय आणिलावणी , लावणी आणि फ्रीस्टाईल , लावणी आणि फोक आणि या सगळ्या गाण्यांना दादा कोंडके स्पेशल तडका पाहायला मिळेल. दादा कोंडके आणि लावणी हे मिश्रणच मनोरंजनाची १०० टक्के गॅरंटी देते . अप्सरा आली हा कार्यक्रम झी युवावर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे . सर्वच अप्सरा एकमेकींना आव्हान देत उत्तोमोत्तम नृत्याची मेजवानी देत आहेत . या कार्यक्रमाच्या परीक्षक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि सौंदर्यवती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , दीपाली सय्यद आणि त्यांच्याबरोबर लावणीची राणी सुरेखा पुणेकर आहेत . सिद्धार्थ चांदेरकर हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.