अनिलसिंग चव्हाण, बुलडाणा,
अवैध धंदे बंद न केल्यास उपोषण करणार :-निलेश चिपडे
संग्रामपुर तालुक्यातील सोनाला पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये टुनकी ,सोनाला, व इतर गावात जोमात अवैध सट्टा मटका,दारू धंदे राजेरोज सुरु असून पोलीस प्रशासनाचा या अवैध धंद्यावर वचक राहिलेला नाही. राजेरोज चालणाऱ्या या अवैध सट्टा मटका दारू धंदे बंद करण्याची तक्रार निलेश पांडुरंग चिपडे यांंनी 25 जाानेवारी रोजी सोनाला पोलिस स्टेशन मध्ये केली होती, पण या तक्रारीची पोलिस प्रशासन दखल घेतिल का असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे. पोलिसांना मिळणाऱ्या चिरीमिरी मुळे याठिकाणी कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे येथील परिस्थिती भीक नको, पण कुत्र आवर अशी झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने री यांच आशीर्वादाने गेली कित्येक दिवसा पासून है अवैध धंदे जोमात सुरु आहे याचे चित्र दिसत आहे , पण सोनाला पोलिस स्टेशन यांनी जाणून बुजुन दुर्लक्ष केले आहे तरी या कड़े जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब लक्ष देतील का नाही ? जर सोनाला पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यानी कारवाई केली नाही तर पोलिस स्टेशन समोर आपण उपोषण करणार असल्याचे निलेश चिपडे यांनी निवेदनात म्हटले आहे.