भूषण गरूड पुणे. बिबेवाडीत गंगाधाम चौक ते व्ही.आय.टी चौक या रस्त्यावर काही महिन्यापूर्वी रस्त्यावरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत अरुंद रस्ता रुंद केला. रुंद रस्ता खोदून तो समांतर करण्यात येत आहे व जो समांतर रस्ता झाला आहे, त्या समांतर रस्त्यावर डांबरीकरण्याचे काम सुरू असताना काही व्यवसायिकांच्या अनधिकृत बांधकामामुळे रस्त्याचा कामाला अडथळा निर्माण होत होता.
मंगळवार दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी लोकप्रतिनिधी बाळासाहेब ओसवाल यांच्या उपस्थितीत आई माता मंदिर ते काकडे वस्ती समोरील चौकाच्या रस्त्यावरचे अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई केली. गंगाधाम चौक ते व्ही.आय.टी चौक च्या रस्त्यावर अनधिकृत बांधकामावर लवकर कारवाई करून ह्या रस्त्याचा नागरिकांना फायदा व्हावा व कारवाईवेळी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी बाळासाहेब ओसवाल स्वतः उपस्थित राहून महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई वेळी अभियंते बाळ मंचरे, उपअभियंता जयंत जोशी, कनिष्ठ अभियंता राखी चौधरी तसेच बिबेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा रामचंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक भूषण आडके, महिला पोलीस निरीक्षक कविता निंबाळकर व पोलिस कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई शांततेत पार पाडण्यात आली.