सुप्पर इंदिरानगर मध्ये चेंबर ब्लॉकेज मुळे सांडपाणी रस्त्यावर

763
भूषण गरूड पुणे.
बिबवेवाडीत सुप्पर इंदिरानगर मध्ये चाळ नंबर बी-९२ समोर सिद्धार्थ नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून सांडपाण्याचे चेंबर ब्लॉकेज मुळे ओव्हरफ्लो होत आहे. त्यातील घाण पाणी परिसरातील घरा जवळ पसरत व साठत आहे. याबाबत महानगरपालिकेच्या सबंधित विभागीय कार्यालयाला नागरिकांतर्फे माहिती देण्यात आली आहे. तरी त्यावर हवी तशी कोणतीही कार्यवाही होत नाही. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लहान मुले, वयोवृद्ध तसेच नागरिक या रस्त्यावर ये जा करत असतात. जर नागरिकांचे आरोग्य बिघडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सबंधित विभागाने यावर त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.