पाच वर्षाच्या मुलीला चटके देणाऱ्या निर्दयी मातेस अटक

874

गिरीश भोपी, पनवेल, नवी मुंबई :-                                                                                                         जास्त मस्ती करत असल्याने एका आईने व मुलीच्या काकीने पाच वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे मेणबत्तीचे चटके  दिले. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये ही घटना घडली आहे. ‘माता न तू वैरणी’ याचा प्रत्यय नवी  मुंबईत आला.मुलीचे वडील घनश्याम यादव (वय 23 वर्ष) कामावरुन घरी परतले तेव्हा चिमुकल्या मुलीची अवस्था पाहून धक्काच बसला. चटके कोणी दिले, याची मुलीकडे विचारणा केली असता तिने आई आणि काकूचं नाव सांगितलं. मुलीचे वडील भाजीविक्रेता असून त्यांचं कुटुंब कळंबोलीमधील रोडपाली परिसरात राहतं.

                                                                            या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या महिलेला आणि तिला साथ देणाऱ्या मुलीच्या काकूला अटक केली आहे. अनिता यादव (वय 25 वर्ष) असं आईचं नाव असून रिंकी यादव (वय 24 वर्ष) काकूचं नाव आहे