फुलपाखरूमध्ये अवतरली पेशवाई

793

अनिल चौधरी, पुणे 

पगडी, सदरा-धोतर अशा वेशातील पुरुषमंडळी आणि नऊवारी साडी, अंबाडा, नथ अशा साग्रसंगीत वेशभूषेतील कलाकारांची फुलपाखरू या मालिकेच्या सेटवर लगबग सुरू होती. मुहूर्त होता मानस आणि वैदेही यांच्या बाळाच्या बारशाचा. आणि सगळीकडे दिसत होता पेशवाईचा थाट… तसं पाहता फुलपाखरू आणि पेशवाई लांब लांब पर्यंत संबंध नाही. मात्र दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची फुलपाखरू ही मालिका तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. मानस आणि वैदेही हे तर आजच्या तरुणाईचे जीव की प्राण आहेतंच मात्र आता त्यांचं होणार बाळ म्हणजे काय असेल याची कल्पना करूच शकता . आणि या बाळाचं बारसं साध्या पद्धतीने करण्यात काय ती मजा??  त्यामुळेच मंदार देवस्थळींनी एक शक्कल लढवली. फुलपाखरू मध्ये आणखी एक गाणे शूट केलं. मानस आणि वैदेहीचे हे ड्रीम सॉंग असून पेशव्यांच्या घरातील बाळाचे ज्याप्रमाणे राजेशाही पद्धतीने बारसे  होत असे, हे गाणे त्यापद्धतीने शूट केले आहे . यात मानस आणि वैदेहीचे संपूर्ण कुटुंब मराठमोळ्या पेशवाई पद्धतीच्या कपड्यांमध्ये असून मराठमोळ्या राजघराण्याच्या आभास निर्माण करण्यात आले आहे. सगळेच अतिशय सुंदर दिसत आहेत आणि मुख्यतः मानस वैदेहीची मुलगी तर अगदीच राजबिंड दिसत आहे. हा एपिसोड येत्या महारविवारी १० फेब्रुवारी ला रात्री ८ वाजता झी युवावर पाहायला मिळेल.         हृता दुर्गुळे हिला याबद्दल विचारले असता तिने सांगितले, ‘ आपण मराठी आहोत त्यामुळे आपल्यातलं मराठीपण आपण जपलं पाहिजे. आपल्या परंपरा आपले आधीची लोक परिधान करत असलेले कपडे दागिने खूपच सुंदर होते. आज या ड्रीम सिक्वेन्स मुळे मलाही तो पेहराव करता आला याचा आनंद आहे. मुख्यतः मानस वैदेहीचे बाळ त्या कपड्यात खूप गोड दिसतेय. प्रेक्षकांना हा महारविवार चा एपिसोड नक्कीच आवडेल.                                                                       नांदे सुखाची सावली, नाती अतूट ही बांधली … गाण्याचे बोल असून गोड गळ्याची गायिका सावनी रवींद्र आणि यशोमान आपटे यांनी  हे गाणे एकत्र गायले आहे .  विशाल राणे हे या गाण्याचे संगीत दिग्दर्शक असून फुलपाखरू कुटुंबातील मुख्य शीर्षक गाणे पकडून हे १७ वे गाणे आहे. . झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि मनोरंजनाचा महारविवर १० फेब्रुवारीला झी युवावर पाहायला चुकूनही विसरू विसरू नका.