प्रेमात पाडणारा लकी

830

योगेश बारस्कर, पुणे :-                                                                                                                         आई वडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली लहानपणापासूनच वावरणारा लकी नंतर इतरांप्रमाणे आपणही प्रेमात प्रेमात पडावे या इच्छेपोटी खऱ्या प्रेमाच्या शोधात निघतो. सुरवातीला  सातच्या आत घरात टाईप असणारा लकी नंतर विषारी साप कसा होतो आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे कसे बदलत जाते हे जाते हे अतिशय रंजकपणे लकी या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.  दिग्दर्शक संजय जाधव यांनी पहिल्यांदाच  स्टार कास्ट सोबत चित्रपट न करता नवोदितांना संधी देत या चित्रपटामध्ये मनोरंजनाचा विनोदाच्या अंगाने तडका दिलेला आहे. अभय महाजन आणि दीप्ती सती या कलाकारांनीही अतिशय समरसून काम केल्यामुळे चित्रपट एक एंटरटेनमेंट पॅकेज पॅकेज झाले आहे.                                    लकी (अभय महाजन)  हा इतर मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगा. कॉलेजच्या मित्रांप्रमाणे आपणही कोणाच्यातरी प्रेमात पडावे ही त्याची साधी भोळी इच्छा. परंतु संकेत ( मयूर मोरे) या वाढीव मित्राच्या सगळ्यामुळे प्रेम म्हणजे केवळ शरीर सुख आणि त्यासाठी आपण विषारी नाग झाले पाहिजे अशी समजूत लकी च्या डोक्यात डोक्यात घुसते आणि त्यातूनच त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळते. मित्रांसोबत सहलीसाठी गोव्याला गेले असताना आपली मैत्रीण जिया (दीप्ती सती) सोबत शरीर सुख घेण्यासाठी धडपडणारा लकी आणि त्यानंतर यासाठी त्याला करावे लागणारे उपद्व्याप आणि त्यातून त्याला खऱ्या प्रेमाची कळालेली व्याख्या हे या चित्रपटांमध्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे. अभय महाजन आणि दीप्ती सती या नवीन नवीन जोडी सोबत चित्रपट अतिशय वेगवान पद्धतीने पुढे सरकतो. ही जोडी जरी नवीन असली तरी त्यांच्या अभिनयातून त्यांचा नवखेपणा अजिबात अजिबात जाणवत नाही. विशेषतः अभय महाजन याने आपल्या अभिनयाने कमाल केली आहे. अनेक दृश्यांमध्ये केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून त्याने बाजी मारली आहे. प्रायोगिक नाटक आणि गंभीर भूमिकांबरोबरच भूमिकांबरोबरच  आपण विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावून नेऊ शकतो हे अभय महाजन याने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. छोट्या भूमिकांमध्ये चेतन दळवी, शशांक शेंडे या दिग्गज कलाकारां बरोबरच मयूर मोरे आणि केतन मिसाळ यांच्या सारखे सारखे यांच्या सारखे मिसाळ यांच्या सारखे सारखे यांच्या सारखे सारखे नवीन पिढीतील कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे, चित्रपटातील अमित राज आणि पंकज पडघन  यांचे संगीत रोमँटिक . तुझ्या नावातच आहे ल, माझ्याकडं बघतीया यांसारखी गाणी चित्रपटाला अधिक सुंदर बनवतात.  चित्रपटाची निर्मिती मूल्य ही अतिशय चांगल्या दर्जाची आहेत कपड्यांपासून ते सेट पर्यंत आणि मेकअप पर्यंत  सर्वच गोष्टींमध्ये आपल्याला चकचकीत पणा पणा जाणवतो. मध्यंतरापर्यंत अतिशय वेगवान आणि विनोदी पद्धतीने भरलेल्या चित्रपट मध्यंतरानंतर मात्र अनेक अनावश्यक दृश्यांमुळे संथ होतो आणि त्याची वाटचाल वेगळ्याच दिशेने चालू दिशेने चालू होते. त्यामुळे मध्यंतरानंतर एक प्रकारे दिग्दर्शकाची दिग्दर्शकाची चित्रपटावरील पकड सुटल्या सारखे वाटते. पटकथेतील गोंधळामुळे मध्यंतरानंतर चित्रपट अपेक्षा पूर्ण करण्यात थोडासा कमी पडतो परंतु तरीही अरविंद जगताप यांचे खुसखुशीत संवाद चित्रपटाचा जिवंतपणा कायम ठेवतात.  मराठी चित्रपटाचा चकचकीतपणा संजय जाधव यांचे दिग्दर्शन आणि अभय महाजन आणि दीप्ती सती या कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी आणि ल म्हणजे लकी म्हणजे लकी की आणखी काय हे समजून घेण्यासाठी एकदा तरी लकी हा चित्रपट पाहायलाच हवा हवा हा चित्रपट पाहायलाच हवा…