कोंढव्यात तरुणीवर बलात्कार करणार्‍या नराधमास ७ वर्ष सक्तमजुरी; ७ हजार रुपये दंडाची शिक्षा

889

भूषण गरुड, पुणे 

कोंढवा खुर्द मध्ये दिनांक १०ऑक्टोबर २१०४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुलाब लालम पठाण (वय ४५, रा.कोंढवा खुर्द) या नराधमास जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
     घटनेच्या दिवशी पीडित तरुणी घरी एकटीच होती तिची आई बाहेरगावी तर भाऊ कामाला गेले होते. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत गुलाब पठाण दुपारी दोनच्या सुमारास घरात घुसून तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीने घडलेला हा प्रकार घर मालकीनीला सांगितला. पीडित तरुणीच्या दोन्ही भावांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गुलाब पठाण याला जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्यांच्यात भांडण झाले. यावेळी तरुणीच्या भावांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  व गुलाब पठाण याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
     न्यायालयाच्या नमूद आदेशात पीडितेचा जबाब व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली तसेच दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये पीडिताला नुकसान भरपाई स्वरूपात देण्यात यावी दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही यावेळी माननीय न्यायमूर्तीनी यावेळी दिलेल्या निकालपत्रात सांगितले.
   या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक(गुन्हे) अंजुम कासम बागवान यांनी केला तर न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार संतोष अंगणे, पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी केला.