ग्रामीण जीवनावर आधारीत “पाहू की नको” वेबसिरीज लवकरच प्रदर्शित

1527

सागर पवार, जामखेड,प्रतिनिधी:-                                                 उस्मानाबाद जिल्ह्य़ातील प्रसिद्ध असलेले आई येडेश्वरी देवस्थान यांच्या कुशीत वसलेले बांगरवाडी हे गाव या गावातील दिग्दर्शक अविनाश भांगे यांनी आपल्या पाहू कि नको या वेब सिरीज च्या माध्यमातून ग्रामीण जीवन पडद्यावर आणण्याचे ठरविले आहे. त्यांनी या अगोदर विरह या मराठी चित्रपटातून ग्रामीण जीवन पडद्यावर आणत आहे.
      हा चित्रपट येत्या मे महिन्यात 15 तारखेला प्रदर्शित होत आहे . आता ते वेब सिरीज च्या माध्यमातून उस्मानाबाद आणि महाराष्ट्रातील सामान्य कलाकारांना घेऊन काम करत आहेत. आपल्या वेब सिरीज च्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजासमोर मांडत आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन अविनाश भांगे यांनी केले असून कथा – लेखन विजय खाडे यांनी केले आहे. या मध्ये छायाचित्रण बाबासाहेब बोंबले, कुलदीप गोतावळे, विश्वजीत मंडले यांनी केले. वेशभूषा पल्लवी भांगे, रंगभूषा मीना पारिसे, संगीत सागर, संकलन इंद्रजीत पवार, व्यवस्थापक वैभव निकम व कुलदीप चंदनशिवे, कलाकार गिरीजा आंबेकर, संतोषी पोर्णिमा, अविनाश, ऋषिकेश, विश्वजीत, पुनम, मीना, अर्चना, प्रिती, सोनाली, विशाल, लखन, राजू, स्वाती, शंकर आदी कलाकारांनी या वेब सिरीज मध्ये काम केले आहे.
       ही वेबसिरीज श्री गौरी फिल्म प्रोडक्शन हाऊस निर्मित पाहू कि नको येत्या 10 तारखेला रिलीज होणार आहे.