संजय जाधवांचा नवा अवतार ‘सूर सपाटा’मध्ये दिसणार खलनायकी अंदाज

788

अनिल चौधरी, पुणे                                                  चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचं हाती कसबअसणाऱ्या संजय जाधवांची अभिनयाची इनींग सध्या जोशात आहे. अनेक मराठी चित्रपटांना आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये उत्तमरीत्या कॅप्चर करणारे सिनेमॅटोग्राफर, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवणारे दिग्दर्शक, युवा पिढीला आकर्षित करणारी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सारख्या मालिकांचे ट्रेंडसेटर द वन अँड ओन्ली संजय जाधव हे मराठी चित्रमनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्काच म्हणा ना! सिनेमॅटोग्राफी, लेखन, दिग्दर्शन आणि आत्ता अभिनयक्षेत्रातही आपलं लक आजमावण्यासाठी संजय जाधव सज्ज असून आगामी लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत आणि मंगेशकंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ या
मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच ते एका खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.खेळांवर आधारित चित्रपट तसे एकूणच कमी पाहायला मिळतात मराठीत तर त्याहून कवचित. अशातच जयंत लाडे प्रेक्षकांसाठी एक अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ घेऊन येत आहेत. कबड्डीला आज अनन्यसाधारण महत्त्व आलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डीची दखल घेतली गेलेली आहे. याला अनुसरूनच ‘सूर सपाटा’ची कथा मंगेश कंठाळे यांनी बांधली आहे. तर अभिनय जगताप यांचे सुमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. गावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास रेखाटणाऱ्या ‘सूरसपाटा’मध्ये संजय जाधव एक सरप्राईझ एलिमेंट म्हणून दिसतील. आता पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत या चित्रपटामध्ये साकारलेली ‘कबड्डी प्रशिक्ष – शंकर जगदाळे’ची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशीच आहे.

किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूर सपाटा’च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून ह्या गुलदस्त्यातील महत्वाच्या उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खास उलगडण्यात आल्या आहेत तर इतर कलावंतांची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्ये आपल्याला पहायला मिळतील. पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांचीआहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्यालेन्समधून चित्रित करण्यात आला आहे.

अनेक चित्रपट आणि मालिकां ना मार्गदर्शन करणाऱ्या संजय जाधवांचं नेतृत्त्व ‘सूर सपाटा’तील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतं हे पाहणं रंजक ठरणार असून त्यासाठीआपल्याला २२ मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण संजय जाधवांची नवी इनिंग दर्शवणारा ‘सूर सपाटा’ २२मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.