विज्ञान कथेवर आधारित उन्मत्त २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

818

अनिल चौधरी, पुणे :- 

२४ एफ एस निर्मित ‘उन्मत्त’ हा चाकोरीबाह्य चित्रपट येत्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ‘स्लीप पॅरालिसीस’ चा अनाकलनीय अनुभव स्वता अनुभवल्यानेच दिग्दर्शक महेश राजमाने यानी त्यांच्या अनुभवावर आधारीत “उन्मत्त” या चित्रपटाची कथा लिहिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. स्वप्नांचे आभासी जग आणि प्रत्यक्ष जग, जगाची उत्पत्ती, देव अन दानव, प्रेम आणि प्रतिशोध या सर्व संकल्पनांचा उहापोह या चित्रपटात असून, हॉलीवूडपटाच्या धर्तीवर बनलेला हा सायन्स फिक्शन मराठी चित्रपट, वेगळ्या विषयावरचे चित्रपट पाहणा-या, तमाम मराठी-अमराठी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास दिग्दर्शक महेश राजमाने यांनी पत्रकार परिषदेत  व्यक्त केला.

        कथेचं बीज आणि बाज ही या चित्रपटाची जमेची बाजू आहेच, पण यात वापरले गेलेले स्पेशल इफेक्ट्स आणि अंडरवॉटर सीन्स  हे “उन्मत्त” या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहेत. हा अनुभव प्रत्यक्ष पडद्यावर घेताना एक नवीन जग प्रेक्षकाना उलघडेल.या चित्रपटात मुख्य भुमिकेत आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर असे तरुण रक्ताचे, अस्सल रांगडे पण कसलेले अभिनेते असून प्रत्येक पात्र जिवंत करण्यासाठी त्यानी अपार मेहनत घेतली आहे. राजेंद्र खैरे हे या चित्रपटाचे निर्माते असून, शहाजी शिंदे सहनिर्माते आहेत. लेखन व दिग्दर्शन महेश राजमाने यांचे तर संवादासाठी सह्कार्य प्रशांत जोशी यानी केलय.. गीते शिवाजी जोशी, गावडा व महेश राजमाने यानी लिहिली असून रुपाली मोघे आणि  जसराज जोशी यांनी गायली आहेत. चित्रपटातली गुढता आणि थरारकता अधोरेखीत करणारं संगीत व पार्श्वसंगीत युगंधर देशमुख यांनी दिलय..  तर छायचित्रण इंद्रनील नुक्ते आणि स्वराज घाडगे यांचे आहे.  चित्रपटाच्या प्रसिद्धी प्रमुख सुनंदा काळूसकर असुन, सोशल मेडिया मॅनेजर श्रीनिवास कुलकर्णी तर कुमार गावडा हे या चित्रपटाचे बिजनेस हेड आहेत. २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘उन्मत्त’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आहे.