‘लोकराज्य’च्या फेब्रुवारी अंकाचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याहस्ते विमोचन

1706
lokrajyabook

पुणे दि. 11 :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या  लोकराज्य मासिकाच्या फेब्रुवारी,2019 च्या अंकाचे विमोचनराज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांच्याहस्ते येथील नवीन प्रशासकीय भवन येथे आज झाले. यावेळी माहिती उपसंचालक मोहनराठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नोंदणी विभागाचे राजेंद्र हिंगणे, सहायक संचालक श्रीमती वृषाली पाटील, माहिती सहायक जयंत कर्पे उपस्थित होते.

            नागरिकांच्या सोईसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे विविध योजना डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. यामुळे दस्तनोंदणीची कामे सुलभ होणार असल्याने नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी याप्रसंगी केले. नोंदणीविभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ई-सेवांविषयी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व अभ्यागतांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी यावेळी केले. सुरक्षित कागदपत्रे-सुरक्षित समाज,गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार,स्वच्छता हीच सेवा, नवे तंत्र-गतिमान विकास, शेती विकासाचा डिजीटल अध्याय यासह अन्य विषयांवर या अंकामध्ये माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.                                                                                                                       शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा  माहिती कार्यालय,  तळ मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे दूरध्वनी क्रमांक 020-26121307 येथे वार्षिक वर्गणी भरुन लोकराज्यचा अंक घरपोच पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.