Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेसई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स

सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स

अनिल चौधरी,पुणे
मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे, ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.

सई ताम्हणकरला ह्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचे ठरवले आहे.”

सई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करतेय.

सूत्रांच्या अनुसार, जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोवर्स मिळवण्याच्या जवळपास शोबिझमधले सेलिब्रिटी असतात. तेव्हा ते जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोवर्स वाढवण्यावर भर देतात. मात्र सई नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. ही सईची एक बोल्ड मुव्ह म्हणायला हरकत नाही.

पण एक मात्र नक्की सईच्या ह्या निर्णयाने आता तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर आता सई सोशल मीडियावर परतताना काही नवी सरप्राइजेस घेऊन येणार का? ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.

 

Malhar News….

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!